मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३

जीवन चक्र


विषय.. जीवनचक्र


 मिळाला मानव जन्म
लावू सार्थकी तयाला
करू आनंदी जीवन
खरा अर्थ जगण्याला

दिले सुदृढ शरीर
 होऊया विचारवंत
विद्यार्जन करुनिया
होऊ आपण भाग्यवंत


ठेवूनी  सकारात्मक भाव
घेऊ जीवनी  भरारी
उज्वल यश मिळणार
देतात मनास  उभारी


कृपा असतेच देवाची
महोत्सव करा जगणे
देतो तोची पाठबळ
नको रडणे कुढणे

रोज होता सकाळ 
दाविते नव्या दिशा
लुटा आनंद जीवनी
पुन्हा उद्या नवी ऊषा

जीवन चक्र चाले पुढे 
करा ‌क्षण क्षण उल्हासित
मस्त आनंदें जगावे
शोधा मोद सदोदित

वैशाली वर्तक
 अहमदाबाद
[

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...