सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३

भारत देश गीत.. तिरंगा\आम्ही भारतीय!|माझा भारत माझी शान , मोल स्वातंत्र्याचे

 आम्ही भारतीय  (12 वर्णीय)
आम्ही कोण म्हणोनि काय पुसता
येता मनीं असा विचार जयाच्या
नागरिक च असे , तो भारताचा
नसा नसात देशभक्ती तयाच्या.

जिथे दिसे समता भाव सर्वत्र
असुनिया जाती न् धर्म अनेक
न करी कधी भेद भाव तयात
तोचि असे "आम्ही भारतीय " एक.

अभिमान हा , तयांना संस्कृतिचा
बाळकडू प्यायलेला संस्काराचा
परोपकारी जीव सदा तयाचा
भाव वसे सदा विश्व बंधुत्वाचा.

रक्ताचा एक ,थेंबही न सांडिता
विलीन केलीत संस्थाने अनेक
राखूनिया केवळ शब्दांचा मान
घडविला अखंड भारत एक.

अशी नांदे विविधतेत एकता
स्वातंत्र्य वीरांची किती गावी गाथा
लाल -बाळ-पालांची स्मृती जगता
भारतीयांची जी , उंचाविते माथा

घडविण्या बदल नव्या युगाचा
पाऊल भारतीयांचे पुढे सदा
आली कितीही परकीय संकटे
न डगमगे मन , तयांचे कदा. .
......वैशाली वर्तक.


-- माझा भारत माझी शान

भारत देश माझा महान
मला त्याचा सदा अभिमान
प्राणाहूनी असे मज प्रिय
गौरविण्यात असे माझी शान

वसे समतेचा भाव सर्वत्र 
न दिसे कधी भेद भाव तयात
असुनिया जाती धर्म अनेक
असा देश नसे कुठे जगात


एकता नांदे माझ्या  देशात
विलीन केलीत संस्थाने अनेक
राखुनिया मान शब्दांचा
घडविला अखंड भारत एक.

अशी नांदे विविधतेत एकता
स्वातंत्र्य वीरांची किती गावी गाथा
लाल ,बाल ,पालांची स्मृती जागता
नागरिकांचा  उंचावतो माथा


अभिमान वाटे शास्त्रज्ञांचा
 नव्या युगाचा बदल घडविण्यात 
  प्रगतीशील  भारत देश माझा
टाकिले पाऊल अंतरिक्षात

वैशाली वर्तक
अहमदाबाद 








प्रेमाची अक्षरे साहित्य  समूह प्रथम  वर्धापन  दिना निमित्ताने  
आयोजित  काव्य लेखन महास्पर्धा
पंचम फेरी
विषय ...तिरंगा  तिरंगा

पहा   फडकतो तिरंगा नील गगनी 
 वाटे अभिमान सदा माझ्या मनो मनी
        
        तीन रंगात आहे भाव मनीचे शुध्द
         हिरवा दावी देश आहे सदा समृध्द
       भगव्यात  त्याग भावना क्षणो क्षणी
     वाटे अभिमान सदा  माझ्या  मनो मनी         1

पाहून तिरंग्यास उर  येतो भरुनी
क्रांती वीर लढले तया कवटाळूनी
 पांघरता हुत्म्यास तो दुःख वाटे मनी
वाटेअभिमान सदा माझ्या  मनो मनी

शान तिरंग्याची आनंद देई मनाला
सहज संदेश देतो शांतीचा जनाला
कार्यरत रहाण्या सांगे  तो चक्रातूनी
वाटे अभिमान सदा माझ्या मनोमनी

कोड 1205


१४ व १५ ऑगस्ट २०२३
विषय - मोल स्वातंत्र्याचे..

 होत होते अत्याचार  अमाप
 सहावेना  जनतेला पारतंत्र्य
आपल्याच देशात  नव्हते
 आपणास   कसलेच स्वातंत्र्य 

पेटून उठले भारतीय
पेटविण्या मशाल स्वातंत्र्याची
हसतमुखे झाले उदार  जीवावर
दिली  क्रांती वीरांनी आहुती प्राणांची 

आज आपण आहोत स्वतंत्र
पण मोल जाणा त्या स्वातंत्र्याचे
सदा राहू एकजूटीने 
न विसरता ऋण क्रांती वीरांचे

आठवा त्या शहीदांना
वंदे मातरम् म्हणत चढले फाशी
व्यर्थ न जावो त्यांचे बलिदान
तिरंगा सदैव फडकत राहो आकाशी

देशप्रेम देशभक्ती ची मशाल
तेवत राहो सदा अंतरी 
स्वातंत्र्याचे  मोल जाणता
अभिमानाने मान उंचावते खरोखरी 

वैशाली वर्तक
अहमदाबाद





आ भा म सा  प शब्दभाव आयोजित
उपक्रम
विषय.. अभिमान तिरंग्याचा 

  शीर्षक..आज तिरंग्यात पावन झालो 
   
     
होते ध्येय  स्वातंत्र्य प्राप्तीचे
भारतमातेला स्वतंत्र  करण्याचे
आपल्याचा देशात आपण गुलाम 
कधीच मनास न रुचण्याचे

केले प्रयत्न  देशभक्तांनी
तिरंग्याचा सदा राखिण्या मान
धरूनी स्वातंत्र्याची कास मनी
"वंदे मातरम्" चा सदा अभिमान

हसत साहिला तुरूंगवास
करुनी घराची राख रांगोळी 
आस स्वतंत्र भारत पहाण्याची 
हटले नाही मागे झेलता गोळी


 होते  असे वीर देशप्रेमी
वदले मरणांन्ती प्रसन्न  मनाने
"आज तिरंग्यात पावन झालो मी"
 अर्पीला प्राण देशाभिमानाने.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच रत्नागिरी
आयोजित
विषय ...जपू  राष्ट्राची एकता


जिथे दिसे समता भाव सर्वत्र
असुनिया जाती न् धर्म अनेक
न करी कधी भेद भाव तयात
तोचि असे  असे भारतीय  एक.

अभिमान हा , आपणा संस्कृतिचा
बाळकडू प्यायलेला संस्काराचा
परोपकारी जीव सदा तयाचा
भाव वसे सदा विश्व बंधुत्वाचा.

रक्ताचा एक ,थेंबही न सांडिता
विलीन केलीत संस्थाने अनेक
राखूनिया केवळ शब्दांचा मान
घडविला अखंड भारत एक.

अशी नांदे विविधतेत एकता
स्वातंत्र्य वीरांची किती गावी गाथा
लाल -बाळ-पालांची स्मृती जगता
भारतीयांची जी , उंचाविते माथा

घडविण्या बदल नव्या युगाचा
पाऊल भारतीयांचे पुढे सदा
आली कितीही परकीय संकटे
न डगमगे मन , तयांचे कदा. .

अशी आहे संस्कृतीची शिकवण
तिचेच करु सदा जतन
जपू  राष्टाची एकात्मता
घेउ सारे नागरिक मिळूनी वचन

वैशाली वर्तक
अहमदाबाद 
भारत देश 
..
सिद्ध साहित्यिक समूह 
आयोजित उपक्रम 
विषय... भारत देश 
काव्यलेखन 
14/8/24
      भारत देश माझा                              



माझ्या भारत देशाचा
 मला  सदा अभिमान
प्राणाहून असे  प्रिय
त्याच्या  गौरवात शान

भाव वसे समतेचा
धर्म नांदती अनेक
नसे भेद- भाव जना
अशी देश , जगी एक


पहा किती एकात्मता 
होती संस्थाने अनेक
मान ठेवून शब्दांचा  
अखंडित  झाली  एक


देश स्वातंत्र्य वीरांचा
आहे शूर वीरांची गाथा
लाल- बाल- पाल स्मृती 
स्मरताच , टेके माथा


देश हा आत्म निर्भर
येता प्रसंग तो बाका
स्वावलंबी होती जन
येता मदतीच्या हाका

नव्या युगाचे बदल             
प्रगतीची ती चाहुल
राही सतर्क शास्त्रज्ञ 
जगी पुढेची पाऊल

        
  वैशाली वर्तक  
अहमदाबाद

सिद्ध साहित्यिक समूह 
आयोजित उपक्रम 
विषय... भारत देश 
काव्यलेखन 
14/8/24
      भारत देश माझा 

माझ्या भारत देशाचा
 मला  सदा अभिमान
प्राणाहून असे  प्रिय
त्याच्या  गौरवात शान

भाव वसे समतेचा
धर्म नांदती अनेक
नसे भेद- भाव जना
अशी देश , जगी एक


पहा किती एकात्मता 
होती संस्थाने अनेक
मान ठेवून शब्दांचा  
अखंडित  झाली  एक


देश स्वातंत्र्य वीरांचा
आहे शूर वीरांची गाथा
लाल- बाल- पाल स्मृती 
स्मरताच , टेके माथा


देश हा आत्म निर्भर
येता प्रसंग तो बाका
स्वावलंबी होती जन
येता मदतीच्या हाका

नव्या युगाचे बदल             
प्रगतीची ती चाहुल
राही सतर्क शास्त्रज्ञ 
जगी पुढेची पाऊल

        
  वैशाली वर्तक  
अहमदाबाद

चित्र काव्य मंच 
माझी लेखणी साहित्य मंच शहापूर जि ठाणे अंतर्गत 

      ध्वज रोहण

  दिन असे सोनियाचा 
  करु आनंदाचा सण
  स्वातंत्र्यवीरांना स्मरू
  भरूनिया येते मन

  
 दिली प्राणांची आहुती 
वीर चढलेत फाशी
 तिरंग्याला घेत उरी
तिरंगा फडको  आकाशी

 बलसागर  भारत होवो
आत्म निर्भर बनवूया 
 तिरंगा विश्वात शोभावा 
ध्वजा रोहण करूया


त्याग शांती व समृद्धी
याचा संदेश जगाला 
तीन रंगाचा  तो उत्सव 
 उधाण ते आनंदाला 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...