सिध्द साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम
काव्य लेखन
विषय - प्रयत्नांती परमेश्वर
प्रयत्नांती परमेश्वर
प्रयत्ना अंती परमेश्वर
म्हण आहेची उचित
करिता पराकाष्ठा श्रमाने
यश मिळतेच खचित
दिधले देवाने शरीर
करावे प्रयत्न खडतर
मिळाले यश तेनसिंगला
सर केले एवरेस्ट शिखर
साधा किटक कोळ्याच्या
जवळी असे प्रयत्नाची ठेव
पराकाष्ठे पूर्ण करी जाळे
मानवास दिसे प्रयत्ने रुपी देव
झटून अभ्यास करिता
देतो ईश्वर सुयश उज्वल
मनाजोगा येतो परिणाम
प्रयत्ने मिळे, हे मत प्रांजल
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा