स्पर्धेसाठी
कल्पतरु जागतिक साहित्यमंच
आयोजित
आभंग लेखन स्पर्धा
20/6/22
विषय - विरह
व्यथा ऊर्मीलेची
न साहे विरह । कसे कंठु दिन।
मन होई क्षीण । विरहाने ।।
वाटे तू समीप ! तर कळे भास ।
मनी तुझा ध्यास ! लागे जीवा ।।
कितीदा धाडिला । तुजला सांगावा ।
सोड ना रुसवा ! आता तरी ।।
नको वाटे रात्र । जग हे खुशीत ।
अश्रूंच्या कुशीत ! होते सदा ।।
रामाच्या सेवेत । कृतार्थे जगला ।
भाव न जाणिला । उर्मीलेचा ।।
विरह सोशिला । मी राज मंदिरी ।
दुःख ची अंतरी ! नशिबाला ।।
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा