मंगळवार, २८ जून, २०२२

वारकरी

अ भा ठाणे जिल्हा  समूह १
आयोजित 
उपक्रमासाठी
विषय - वारकरी

     *वैष्णवांचा मेळा*

घेता नाम विठ्ठलाचे
 दिसे डोळा वारकरी
विठ्ठलाच्या गजरात
धरुनीया ध्वजा करी


  दर्शनाची  मनी आस
वारकरी टाके पाऊल
कधी जाईन वारीस 
 आषाढात लागे चाहुल

नित्य  नेमाने करी वारी
 चिपळ्या घेऊन हाती
सारे वैष्णव जमती
एकमेकाचे होती साथी


इतका भक्ती भाव वसे
दिसे  विठु एकमेकात
मधेच रिंगण करिता
माऊलीच्या गजरात

न आडवी वारा पाणी
डोळ्या सदा विठु मूर्ती 
उल्हासात येई गती
विठुरायाच देई स्फूर्ती 

वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...