काव्यपुष्प साहित्य मंच समूह आयोजित राज्य स्तरिय काव्य लेखन स्पर्धेसाठी
स्पर्धा क्र ३४
बाल कविता
विषय - ओळ काव्य
*मामाच्या गावाला जाऊया*
*तेच नेमके घडत नसे*
विसरा आता पाटी पूस्तक
हर्ष उल्हासे गीत गाऊया
धमाल करण्या आपण सारे
*मामाच्या गावाला जाऊया* 1
लवकर उठणे कदापि नको
मस्त गादीत पडू लोळत
उठून सकाळी खेळ गोट्यांचा
गच्चीत पत्ते डावाची रंगत 2
मामाचे घर पहा मोठे
वरती खालती किती खण
झुल्यावर झुले घेतच राहू
आनंदाने भरण्यास मन 3
विविध चाॕकलेटने भरलेला
फ्रीज मामाचा आहे मोठा
भेळ पाणी पुरी खाऊया
आईस्क्रीमला नाही तोटा 4
रोजच हवी सुट्टी शाळेला
वाटते मनी सदैव असे
मजा करण्या मामाकडे जाऊ
पण तेच नेमके घडत नसे. 5
वैशाली वर्तक
अहमदाबाद
मामाच्या गावाला जाऊया*
*तेच नेमके घडत नसे*
विसरा आता पूस्तक पाटी
देवाजवळ नैवेद्य वाटी
हर्ष उल्हासे गीत गाऊया.
मामाच्या गावाला जाऊया* 1
आहे घराला खूपच खण
पहा आनंदे भरले मन
झुल्यावरती झुले घेऊया
मामाच्या गावाला जाऊया २
मनी वाटते सदैव असे
तेच नेमके घडत नसे.
शाळेला सुट्टी रोज देऊया
मामाच्या गावाला जाऊया ३
उशीराच उठूया सदोदित
लोळत पडणे आवडे खचित
पत्ते गोट्यांचा खेळ मांडुया
मामाच्या गावाला जाऊया. ४
फ्रीज मामाचा आहेच मोठा
आईस्क्रीमला नाहीच तोटा
भेळ न् पाणी पुरी खाऊया
मामाच्या गावाला जाऊया ५
मनी वाटते सदैव असे
तेच नेमके घडत नसे.
शाळेला सुट्टी रोज देऊया
मामाच्या गावाला जाऊया ६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा