*स्पर्धेसाठी*
विशेषकाव्य लेखन स्पर्धा
दि 21/4/22
विषय - को-या पाटीवर नशिबाचे अक्षर
*शिकस्त केली प्रयत्नाची*
आस होती सुयशाची
शिकस्त केली प्रयत्नाची
झाली अक्षरे सुवर्णांची
साथ मिळता नशिबाची
चाले मधे विनाशाचा खेळ
न होता तरी कष्टी जीवनी
उपसल्या कष्टाच्या राशी
मोद, समाधान सदा मनी
सदा उभा आहे पाठीशी
प्रयत्नांची कास धरी
यश मिळणार सांगे कानी
दृढ विश्वास तो देवावरी
करीता परिश्रम नेटाने
दैव घडते मनगट बळावर
देव घडवितो नशीब प्रेमाने
*को-या पाटीवर नशिबाची अक्षर*
उघडले द्वार स्वर्गाचे
यश मिळाले पदरी
आनंदाला नसे पारावार
प्रसिद्धी ऐकून जन अधरी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा