गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

साथ तुझी हवी


साथ तुझी हवी

कशी राहू मी एकटी
तुज विण क्षणभर
जीवा सवय जडली
तुझी आता जन्मभर

माझे मजला कळेना
कशी तुझ्यात गुंतली
लक्ष लागेना कामात
माझी  न मी उरली


तू मोहन ची माझा 
कधी झाली  मी राधा
सहवास वाटे हवा
जडली तुझीच बाधा

साथ तुझी असता
साहीन ग्रीष्म झळा
तुझ्या  नित्य संगतीचा
लागलाय मला लळा

तुझी साथ हवी मला
वाटे न कशाचे  भय
अक्राळ काळ येता
तुची असे माझा अभय


वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...