उपक्रमासाठी
सावली प्रकाशन समूह
विषय - स्पर्धेतील आव्हान
महत्त्व अपार
स्पर्धा असते आव्हान
जिंकणे वा हरण्यास
देते उत्साह मनास
यश संपादन करण्यास
*स्पर्धेतील आव्हान*
स्विकारावे स्पर्धे पुरते
मनी नसावा द्वेषभाव
मग आनंददायी ठरते
स्पर्धेतील आव्हान
प्रगतीस येते कामी
दावीते आलो कुठवरी
समजण्यास युक्ती नामी
स्पर्धेचे स्विकारावे आव्हान
मिळता यश मन आनंदात
तुलना असावी स्वतःशी
नको निराशा मनी अपयशात
जीवनी चालणार स्पर्धा
कधी जीत तर कधी हार
स्पर्धेचे आव्हान मात्र
उत्कर्षासाठी महत्वाचे फार
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा