विषय - १ साथ दे तू मला
*मन वेडावले*
भेट आपुली पहिली
मज नाही राहवले
माझ्या विचलित मना
तूची मज सावरले 1
पहिल्याच भेटीतला
वाटे अश्वासक स्पर्श
दिले अनामिक सुख
देतो मना सदा हर्ष 2
छंद तुला बघण्याचा
कसे आवरु मनाला
तुझाओझरता स्पर्श
वेड लावितो जीवाला 3
गंध तुझ्याच प्रीतीचा
सदा रहातो अंतरी
मनी वसंत फुलतो
विश्वासाने ऊर भरी 4
ऐक तू मम सखया
देशील ना तू साथ
मन तुझ्या त गुंतले
मागते मी तुझा हात 5
वैशाली वर्तक
अहमदाबाद
भारतीय कोल्हापूर साहित्य मंच
आयोजित
स्पर्धेसाठी
विषय..२ .प्रेम आंधळं असते
छानच वाटे प्रेमात
येताची सहवासात
दिसू लागती उणीवा
हेच घडे जीवनात
आधी भासे हिरवळ
नित्य ची परिचयात
खटकू लागे स्वभाव
जाती वाद विकोपात
हवी तडजोड सदा
फुलतो वसंत मनी
न वदे *प्रेम आंधळं*
समजूतीने जीवनी
लाड मुलांचे करण्या
ठरते प्रेम आंधळ
लाडापायी कौतुकात
होतो नेहमी गोंधळ.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
तू तिथे मी २८/१/२२
३ *आस मनीची*
सुमनांचा गंध कधीच
दूर, न होई खचित
तैसे *तू तिथे मी*
रहाणार सदोदित
आहे तसेच आपले हेझ
दोन तने एक मन
विसर पडे , न कदा
जीवा एकही क्षण
रहावे तू मम संगती
असेच वाटते मनात
साथ हवी निरंतर
हीच आस अंतरात 3
येते नभी चांदणी
वाट पहाते चंद्राची
तैसे *तू तिथे मी*
असणार सदाची 4
कशी जगेल मासोळी
जला विना पळभर
तुझ्या अस्तित्वाने
दिसे दिशा खरोखर 5
वैशाली वर्तक
फक्त तुझी
४ गुंतता हृदय हे
कधी अशी मी गुंतले
माझे मलाची कळेना
काय अशी तुझी जादु
केलीस तू मला उमजेना
आवडे रमणे तुझ्यात
तव विचाराचा ध्यास
होते बावरी तुला बघताच
सदा भेटण्याची आस
गंध विलसतो फुलात
मी वसते तव अंतरी
एकरुप होते मनात
राहीन समीप निरंतरी
जैसे शशी येण्याची नभी
वाट पहाते चांदणी सदा
तीच ओढ मनी माझ्या
मी फक्त तुझीच सर्वदा
वैशाली वर्तक
काव्य निनाद साहित्य मंच पुणे
आयोजित उपक्रम क्रमांक ४५९
४/५/२४
विषय..माझा होशील का?
कधी अशी मी गुंतले
माझे मलाची कळेना
काय अशी तुझी जादु
मला खरेच उमजेना
आवडे रमणे तुझ्यात
तव विचाराचा ध्यास
होते बावरी तुला बघताच
सदा भेटण्याची आस
गंध विलसतो फुलात
मी वसते तव अंतरी
एकरुप होते मनात
वाटे रहावे समीप निरंतरी
जैसे शशी येण्याची नभी
वाट पहाते चांदणी सदा
तीच ओढ मनी माझ्या
मी फक्त तुझीच सर्वदा
घेऊनी कर माझा हाती
आता एकची तुज मागणे
माझा तू होशील का?
हेच तुजला विनवणे.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
मोहरली लेखणी साहित्य समूह
आयोजित उपक्रम
विषय ...आपले प्रेम झुले
7/9/7/9
प्रेम रंगी न्हाहता
प्रीत तुजवरी जडली
आपले प्रेम झुले
दोन मने एक जाहली
तुला माझे मानता
तुझे अन माझे संपले
एकरुप तुझ्यात
माझे मी पण न ऊरले
प्रेम आपुले झुले
येवो किती उन पाऊस
हात हाती असता
उपभोगली सारी हौस
प्रेम रंगी रंगता
रमले स्वप्नात जीवनी
मनाने आनंदले
हिंदोळ्यावर मनोमनी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा