माझी लेखणी साहित्य मंच शहापूर
आयोजित
उपक्रम
विषय - एक दिवस फक्त माझा मी
खरच असे असायलाच पाहिजे. रोज सकाळी उठल्यापासून
सर्वांना काय हवे नको पहाणे ... सर्वांच्या मर्जी प्रमाणे कोणास जे आवडते .त्याप्रमाणे बनवणे. अथवा सदा सर्वदा इतरांच्या
म्हणजे कुटुंबजनांच्या मागे पुढे करणे. यात कित्येकदा आपल्या इच्छांना मुरड घालणे ..असे सर्व साधारण सर्वांच्याच बाबतीत घडत असतेच. त्यात काही वावग नाही .कुटुंब वत्सल व्यक्ती म्हटलेकी की हे सर्व सहाजिक घडत असते. मग त्यात कधी अत्याचार वा मन मोडून पण माणूस जगत असतो.मग ती बाई असो वा पुरुष .
पण एक दिवस फक्त माझा मी असा साजरा करावयास काहीच हरकत नाही .मना सारखे उठणे , हवे तेव्हा इच्छे प्रमाणे जेवणे ...तास न् तास टीव्ही पहात वा मोबाईल वर रमणे. तसेच वेळेचे भान न ठेवता मनमुराद चालायला जाणे स्वतः चे छंद जोपासणे. व मित्रांमधे गप्पांची रंगत अनुभवणे. खरच कल्पना छान वाटते.
तसे रविवार आपण करतो थोड्या फार प्रमाणात तसा साजरा.. तरी त्यात मुले ...नवरा अथवा बायको असतात च एकमेकास
कधी न आवडती गोष्ट करावी लागण्यास .
हल्ली space पाहिजेचे नवे फॕड सुरु झाले आहे. सध्याच्या जीवनात प्रत्येक जण आपापली space ची सोय करत असतात. त्यामुळे या सध्याच्या आधुनिक जनरेशनला तशी एक दिवस माझा ची गरज नसते . कारण एकमेकाची सोय /गैरसोय पहातच जगत असतात. असो .
पण तसा दिवस मिळाला तर कोणास ही आवडेल ..तसे निवृत्त काळात सुख वस्तू घरात मला तरी असा दिवस मिळतो. मी तो आनंदाने उपभोगते. पण किती वेळ सकाळ , दुपार .पण शेवटी आजुबाजूच्या व्यक्तींची आठवण येतेच .आपण भारतीय तसे अलिप्त राहू शकत नाही वा रहाणे जमत नाही.
शेवटी माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्याला माणसे लागतात. स्वतः एकलपणे जगू शकत नाही.
काही तास काही वेळ मजा येईल पण पूर्ण दिवस कंटाळेल.
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा