ओढ तुझी संपत नाही.
वाफे च्या रुपात वा-याच्या सहाय्याने वर वर जाते. इतकी वर की तेथे माझे रुप बदलते.... नाव पण बदलते. नावा बरोबर ओळख पण बदलते...मेघ, जलद ढग वगैरे नावे ओळखली जाते.
अती उंचावर जाते .वरील थंड वातावरणात माझ्या आकारात रंगात पण परिवर्तन होते.
....पण मनी ओढ पुन्हा तुझ्या कडे येण्याची सदैव असतेच.
आणि जन कल्याण करणे हा ध्यास असतोच ना मनी!...तुझ्या पासून दूर दूर आली असते. पण मनी ध्यास तुझ्या कडे येण्याचा ...तुझी अंतरीची ओढ कधीच संपत नाही.
सारे जग माझ्या वर विसंबून असते. उंचावर आल्यावर डोंगरावर जलदांची मस्ती चालते.... त्यात पुन्हा पाण्याच्या रुपात येते. मला जशी सागरा तुलाभेटण्याची... कधी न संपणारी ओढ असतेच ना...... जशी चातक माझी वाट पहात असतो ......धरती डोळे लावून बसली असते बळीराजा पण माझी वाट पहात असतो. ओढ तीचअसते .. मला जशी सागराला भेटण्याची ,...सागर मिलनाची अंतरी असते.
डोंगर माथ्यावरुन अल्लड पणे धावत धावत खाली येते .मला सरिता नावे जन ओळखू लागतात. लोकांना जीवन देत ...बळीराजाला खूश झालेला पहाते... मनी आनंदते. त्याचे हिरवे डौलते शिवार पाहून माझे मन आनंदते. माझे पाणी अडवून
बांध बांधून जन... जल आडवून त्यांना वीज बनविण्यात मदतीस येते.
किती रस्त्यात संकटे आली तरी सागरास येऊन भेटण्याची मनी ओढ सतत असते.
ही जगरहाटी चालू आहे तोवर माझी ओढ अनंत काळ रहाणारच
वैशाली वर्तक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा