अ भा म सा परिषद स्वप्न गंध समूह
आयोजित उपक्रम
विषय -- जीवनाच्या वाटेवर
अष्टाक्षरी रचना
*जीवन वाट*
नसे सदा हिरवळ
कधी खडतर घाट
तर कधी ती सुखद
अशी जीवनाची वाट
पेलावीत ती आव्हाने
टाका खंबीर पाऊल
सुखरुप होता वाट
लागे यशाची चाहुल
मस्त आनंदे जगता
कधी तरी पहा मागे
अनुभव सांगे स्वतः
जोडा त्याचे नीट धागे
नसे जीवनी सदाची
सुख समान ती फुले
फुले पण काट्यातच
हसतच सदा डुले
जीवनाची वाटचाल
जरी असता बिकट
भाव सकारात्मकाचे
यश येते ते निकट
सुखा सुखी मिळते का
जीवनात ते सहज
प्रयत्नांच्या शिकस्तीची
हवी असते गरज
वैशाली वर्तक 16/12/20
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा