गंध तुझ्या प्रीतीचा
सहज सख्या सांजवेळी
उजळल्या त्या आठवणी
दिन आले ते नजरेस
प्रीत गंधित झाली मनी
भेट आपुली ती पहिली
मन थोडे बावरलेले
पाहूनी चलबिचल मनाची
तूची हात देऊन सावरलेले
दिधले अनामिक सुख
अश्वासक प्रेमळ स्पर्शाने
करी धुंद अजूनी जीवास
मन मोहरते हर्षाने
गंध तुझ्या प्रीतीचा
दरवळे सदा अंतरी
रोज वसंत फुललेला
अनुराग सदाची उरी.
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा