अ भा म स परिषद समूह
विषय - *आरोग्य संपदा*
बालपणीची शिकवण
निकोप आरोग्य संपदा
सुदृढ ,निरोगी , आयुष्य
देवास हेच मागावे सदा
आरोग्य असता संपन्न
बाकी सर्व सुखे सहज
करिता प्रयत्ने मिळतात
निकोप शरीर असे गरज
विधात्याचे अनंत उपकार
दिधले तयाने शरीर सुंदर
बहाल केला तयात मेंदु
करा त्याचा उपयोग मनोहर
नियामित आहार विहार
राखावे स्वच्छ तनास
व्यायाम हवाच नेमाने
जो देई आनंद मनास
नका आहारी व्यसनाच्या
सेवावे सात्विक अन्नपाणी
वाईट गोष्टी त्यजता शरीरास
येणार नाही आणीबाणी
बनेल सृदृढ सशक्त भारत
शिकवण दिली पूर्वजांनी
संभाळून जतन करावी
हीच धुरा पुढच्या युगानी
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा