बैल पोळा (अष्टाक्षरी)
आज बैल पोळा दिन
असे माझिया राजाचा
सा-या गावात त्याचाच
गाजा वाजा करण्याचा
असे तोचि शिवारात
कष्ट करी सर्व वेळ
मदतीला साथी तोच
आरामाचा नसे मेळ
खास त्याच्यासाठी करु
पुरणाची पोळी गोड
कृतज्ञता दाखवू या
आज नको औत सोड
रोज राबतो शिवारी
माझा राजा कष्ट करी
देतो मान खास त्याला
असे आज मानकरी
वर्षभर मज संगे
वाहतसे तुच भार
मदतीची आस सदा
शेतावर कष्ट फार
ढोल ताशे वाजवित
मिरवत घरोघरी
आणी तया मिरवित
दृष्ट काढी दारावरी
दिसे चित्र गावातून
शहरात नसे भ्रांत
उत्साहात सारे दंग
गावी नसे कोणी शांत
..............वैशाली वर्तक
चाराक्षरी
**बैल पोळा**
बैल पोळा
माझा राजा
करु त्याचा
गाजा वाजा
कष्ट करी
सर्व वेळ
आरामाचा
नसे मेळ
करु पोळी
आज गोड
नको आज
औत सोड
रोज तोचि
कष्टकरी
असे आज
मानकरी
वर्षभर
तुज भार
शिवारात
कष्ट फार
घरोघरी
येता घरी
दृष्ट काढी
दारावरी
शेतकरी
देई मान
त्याची आज
असे शान
ढोल ताशे
वाजवित
आणी त्याला
मिरवित
शहरात
नसे भ्रांत
पण गावी
नसे
........वैशाली वर्तक
आठोळी........
रोज राबतो शिवारी
माझा राजा कष्ट करी
देतो मान खास त्याला
तोचि आज मानकरी
ढोल ताशे वाजवित
मिरवत आणी घरी
सजलेला येता दारी
दृष्ट काढी दारा वरी
..................
चारोळी
पूजन करीताती कृतज्ञ भाव
सर्जा राजांना झुल पांघरुनी
गळा माळा घुंगुर बांधूनी
मिरवित येतील गावातूनी
........
चारोळी
सजविले बैलांना झुल पांघरुनी
शिवारात वर्षभर बैल कष्टकरी
पूजन करूनी घास दिला गोड पोळीचा
सर्जाराजाच असेआजचा मानकरी
......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा