मोहरली लेखणी समूह
अष्टाक्षरी रचना
विषय -- प्रेम वसे चराचरी
दृष्टी हवी पाहण्याची
दिसे प्रेम चराचरी
नजरेत ती येताच
उमजते क्षणभरी
नदी आहेची जीवन
येते उंच कड्यातून
देण्या जल सकळास
खंत नसे मनातून
प्रेमे मायेने भरली
पृथ्वी बहरली सारी
जलचर विसंबती
तिची प्रेम रीत न्यारी
शशी रवी तारिकांची
प्रेम करण्याची रीत
पहाताच उमजेल
चराचरी वसे प्रीत
उमलता फूल रोपे
सुख मनी जाहलेले
असे प्रेम चराचरी
आहे पहा भरलेले
देव वसे जळीस्थळी
तया संगे प्रेम वसे
शोधताच मिळे मोद
चराचर व्यापतसे
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा