सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

स्वतःच्या गुणांचे कौतुक / कौतुक पंचाक्षरी

छान संधी दिधली आज
 करण्या स्वगुणांचे गुणगान
कशी सोडणार मी तिजला
मी तर आहे गुणांची खाण

आहे मी स्वतः कर्तबगार
स्वभावाने आहे मी शांत
जुळवून घेते मी सर्वांशी 
  न वाद विवादाची भ्रांत

सूनेचे व माझे आहे नाते 
आई लेकीचे असावे जसे
जन म्हणती असावी सासू 
जशी मी आहे  आदर्श  तसे

 पाहूनीआम्हा विहीणींना 
जाते बोट डोळ्याला
लावीती काजळ काढूनी
न लागण्या दृष्ट नात्याला

वैशाली वर्तक







माझी  लेखणी काव्य नगरी समूह आयोजित  
उपक्रमासाठी
प्रकार - पंचाक्षरी काव्य
विषय - कौतुक

करा कौतुक 
आवडे जना
चांगले वाटे
सदैव मना            1

यश मिळता
होतात गोळा
कौतुकासाठी
होतो  सोहळा          2

गोड शब्दांची
आसे गरज
कौतुक पहा 
होते सहज                 3

सोडा आधीच
कंजूसपणा
मनाचा हवा
उदारपणा                  4

कौतुक  करा 
आनंदी रहा
मन प्रसन्न 
होतेची  पहा.              5

सध्याचे युग
हे कौतुकाचे
क्षणा क्षणात
कौतुक नाचे                  6

वैशाली वर्तक 
अहमदाबाद






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...