बुधवार, २९ जुलै, २०२०

ओवी अरे संसार संसार

उपक्रम 
शब्दरजनी  साहित्य  समुह
विषय -- अरे संसार संसार

अरे संसार संसार
नको कदा अहंकार 
दोन जीवांंचा विचार 
मिळे गोमटे फळ

वाटे संसार  सुखाचा 
मेळ त्या दोन जीवांचा
होतो सदा आनंदाचा
सुख ते जपण्याचा

संसार भव सागर
भरा प्रेमाची घागर
होते सुखाचे आगर
प्रेमाने सदाकाळ

नसे सदा सुख दारी
येते कधी दुःख भारी
देव तो पालन हारी
उभा  तो सख्या हरी

 वाटे संसार कठीण
असता तोची नवीन
येताच दिन सुदिन
रम्य होई संसार


वैशाली वर्तक





अ भा म सा प मध्य मुंबई समूह 1
उपक्रम 147
ओवी
विषय -- संसार


अरे संसार संसार
दोन जीवांंचा विचार 
मिळे गोमटे ची फळ
नको कदा अहंकार

वाटे संसार  सुखाचा 
होतो सदा आनंदाचा
मेळ त्या दोन जीवांचा
सुख ते जपण्याचा

संसार भव सागर
भरा प्रेमाची घागर
प्रेमभाव  सदाकाळ
होते सुखाचे आगर


नसे सदा सुख दारी
येते कधी दुःख भारी
उभा  पाठी सख्या हरी
असे तो संकट हारी

 वाटे संसार कठीण
असता तोची नवीन
रम्य होईल संसार
येताच दिन सुदिन



वैशाली वर्तक
अहमदाबाद



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...