रविवार, २० डिसेंबर, २०२०

ललित लेख. आठवांचे मोरपीस

लालित्य  नक्षत्र वेल समूह आयोजित 
उपक्रम  ललित लेख


आठवांचे मोरपीस



अजून आहे ती स्मरणात ...घेतलेली पहिली वा   पहिल्या भेटीचे क्षण...
विचार येताच   गाणे  माझ्या ओठी येते
"भेट तुझी माझी स्मरते....आजून त्या दिसाची..."

      खरच पहिल्या  भेटीच्या क्षणांची आठवण काही औरच.  कोण आधी बोलेल ..काय बोलेल.  मन थोडे भयभीत  असते. कशी बर आणि काय   सुरुवात करु ?. कुठल्या विषयात हात घालू ..काही.sss. काही समजत नसते.
 मग उगाचच पदराचा चाळा चालतो वा वेणीशी खेळ करत बोलणे होते. हो त्या काळी साड्याच नेसायचो .आजकाल सारखे पंजाबी वगैरे नव्हते. त्यामुळे पदराशी चाळा....

         तसच काही से झालेले ते क्षण डोळ्यासमोर  आले.  ती पहीली भेट. ओढ तर असतेच ..कसा असेल आपला सखा.  आपले विचार मांडणे मनात चालू होते  .  तेवढ्यात मनाचा निर्धार  करुन .दोघांच्या तोंडून  एकच शब्द निघतात .,"...मी म्हणत होतो / मी म्हणत होते. .."आणि पुन्हा  स्तब्धता. 

          असेच काहीसे बावचळलेले क्षण  होते व सर्वांचेअसतात. मग  मात्र  गंभीर पणे एकमेकांची  आवड  ..संगीताची आवड वगैरे  आहे का करत गप्पा सुरु ..... आजु बाजुला चालत असलेली हालचाल  डोळ्यांना  दिसत असते पण लक्ष मात्र  नसते. क्षण च तो असतो  तसा ... एकमेकांना  जाणून घेण्याचा .एकमेकात गुंतण्याचा. असेच गुंतत आम्ही पुढे चालत होतो. सहजच झालेला.... ..नाही.... नाही जाणून बुजून केलेला त्याने तो स्पर्श ..अजून आठवणीने मन शहारते. असतोच  क्षण तसा तो. सहजचतेने हात हाती घेऊन ....टाकत गेलो काही  पावले. 

   एकत्र  पावले.. जणू मनास आनंद..  धीर ..विश्वास ..मनात वाटलेले ते क्षण. जणू 
क्षणात भासले आता काहीही संकट आपल्यावर येऊ शकत नाही ..असा त्या वेळेचा वेडा ,....क्षण....हो वेडा ..आता वेडा भासतो. पण तेव्हाचा दृढ विश्वास ..  कारण वेळच अशी असते.एकमेकां शिवाय काही दिसत नसते. आपल्याच विश्वात गुरफटलेले असतो. 

असे मोहक क्षण अनुभवत .बोलत वेळ जातो.  मग मात्र  सहज झालेला स्पर्श  हवा
हवासा वाटलेला. व जणू जीवनाची  वाटचाल कशी असेल याची मनी स्वप्न रंगवीत पावले हातात हात गुंफवित वाटचाल करु लागलो

         चालत चालत कधी घराशी आलो कळलेच नाही. टाटा बायबाय करत 
उद्या च्या भेटीची आतुरता दोघांनी दर्शवत .निरोप घेत .पहिली भेट अविस्मरणीय मनी ठरवत... मनात आनंदाने  घरी परतले. विचाराने पण मन प्रफुल्लित झाले

    असेच असतात ना ते  पहिल्या  भेटीचे क्षण. !


वैशाली वर्तक 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...