पक्षावर
पोपट
**चिंता उद्याची**
होता किलबिलाट चालू पक्ष्यात
पोपट म्हणे मी हुशार सा -यात
पहा माझे रुप अनेक रंगात
शोभतो काळ्या रंगी पट्टा गळ्यात
जात भाऊ वसती परदेशात
होता किलबिलाट चालू पक्ष्यात ... 1
करतो नक्कल अगदी सहज
सरावाची न लागे फार गरज
"या ,"बसा नमस्ते" बोलतो झोकात
होता किलबिलाट चालू पक्ष्यात ... 2
सांगू एकमात्र मानव जातीला
थांबव तोडणे हे राना वनाला
कुठे रहाणार सारे भविष्यात
होता किलबिलाट चालू पक्ष्यात ....3
होता किलबिलाट चालू पक्ष्यात
पोपट म्हणे मी हुशार सा -यात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा