तुझ्या हसाण्याने बहरला ऋतू
होते हास्य सदन भरुन
पण तुझ्या आगमनाने
आले घराला नवे चैतन्य
रोमात भरले ते आनंदाने
वेलीवरच्या जणु उमलल्या
कळ्या तव हसण्याने
सुगंध तयात भरला वाटे
तुझ्या बोबड्या बोलाने
तुझे दुडू दुडू चालणे
नेहमीच देते संजीवनी
जगण्यातला खरा अर्थ
लाभला मम जीवनी
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा