शोध सुखाचा
सारे जीवन संपेल
सुख मात्र शोधण्यात
पण कधी उमजेल
सुख आहे संतोषात
नका करु वणवण
सुख आहे मृगजळ
जाते पळून दूरवर
दुःख राहते जवळ
पहा लोभस निसर्ग
ऊषा झाली ती सुंदर
रवी राजा आला नभी
दृश्य पहा मनोहर
सुख आहे निसर्गात
नभीतील चंद्र ता-यात
पक्षांच्या किलबिलाटात
सुरेल मधुर संगीतात
हाती असलेले सुख
उपभोगा दिन रात
नका संपवू जीवन
सुख सुख शोधण्यात
ऐका सदा संत वाणी
सांगताती कानोकानी
नसे कुणी जगती सुखी
रहा सदा समाधानी
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा