सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९

हुंदका तव विरहाचा

स्पर्धेसाठी
काव्य
हुंदका तुझ्या  विरहाचा
वर्णे  9

कशी मी साहू हा विरह
कैसे कंठू दिन एकेक
"  हुंदका तुझ्या  विरहाचा"
उदास दिन  हा प्रत्येक


नयनी दिसे तव मूर्ती
पहावे, तर कळे भास
वाटे तू आलास समीप
ध्यानी मनी तुझाच ध्यास


अनिल, शशी करवी - ही
कितीदा धाडिला सांगावा
धरिलास का रे अबोला
कर ना , तू दूर रुसवा


वैरीण भासे मज रात्र
जग हे निद्रेच्या खुशीत
रहाते मी तळमळत
तव आठवांच्या कुशीत


राहूनी सेवेत रामाच्या
कृतार्थ पणाने जगला
माझ्या मनीचा मुक भाव
कधी न तुला उमगला


असुनी मी राज मंदिरी
सोशिली दशोत्तरी चार
अंधारातील ज्योती सम
विरह सोशिला अपार. .


..... वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...