सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९

निशु शब्दिका/राधाकृष्ण प्रेम सहाक्षरी राधेचा श्रीहरीनार गवळ्याची

राधा कृष्ण प्रेम
निशु शब्दिका काव्य

जिथे पहाते तिथे
तो एकमात्र
कृष्णच कृष्ण
दिसे तिला सर्वत्र     1

राधेचे मनी चाले
हरी चिंतन
कृष्ण कृष्ण ची
बोले तिचे कंकण     2

कृष्ण वाजवी पावा
बावरी राधा
वळूनी पाहे
प्रीती ची तीज बाधा   3

वृंदावनी ती खेळे
हरीचा संग
राधा मुरारी
खेळण्यात ची दंग     4

मुरलीचा तो नाद
पडता कानी
बावरी राधा
होई कृष्ण दिवानी     5

मूर्ती मंत हे प्रेम
भक्ती प्रतिक
ते अव्दैताचे
प्रेम त्यांचे सात्त्विक     6

वैशाली वर्तक  28/9/2019







साहित्य  प्रज्ञा समूह आयोजित 
षडाक्षरी काव्य लेखन
विषय -  राधेचा श्रीहरी


ध्यानी मनी तिच्या l 
देवकी नंदन l
मुखी हरीनाम
करिता मंथन l 


अविरत करी l 
हरिचे चिंतन l
बोली कृष्ण कृष्ण 
तियेचे कंकण l


नको जाऊ कृष्णा l 
कैसे कंठु दिन l
जीव तुजवीण ll 
माझा होतो क्षीण l


मुरलीचे वेड l
 लावीतो श्रीहरी
 आहे राधाभोळी 
भाळीली बावरी l 

राधा रमणचे l
 प्रेमच आगळे l
आहे सर्वाहून l
जगी या वेगळे l 

श्रीहरी राधेचा l 
आत्मा एकरुप l
पहा अव्दैताचा l
प्रगटला दीप l

वैशाली वर्तक 
अहमदाबाद









मनातली काव्य अक्षरे
विषय - नार गवळ्याची

नार गवळ्याची
वेडी ती राधिका
मग्न चिंतनात
संगती गोपिका          1

राधा गवळण
करिते चिंतन
अविरत मनी
करिता मंथन           2

तिचा तो मुरारी
वाजवी बासरी
ऐकता सुरांना
होते ती बावरी          3

दुध दही लोणी 
घेऊनी  बाजारी
गवळणी जाती
गोकुळच्या नारी     4

आक्रोश करीती
सा-याच गोपिका
नेता मोहनास
विनवी राधिका  5

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...