पणती असतेच छोटी
तिचा प्रकाश असतो मिणमिणता ,
पण प्रकाश दूर सारतो अंधार
जो असतो तिमीर. दु:खाचा, अज्ञानाचा
असाच तिमीर दूर सावरण्याचा
केला मी छोटासा प्रयत्न .
दिवाळीचे दिवस आले जवळ
दुकाने होती सजलेली आकर्षक .
घरी फराळाचे डबे गेले भरले
आणि मिठाईचे आकर्षक बॉक्स
पण आलेले ,तसेच आणलेले
रासच्या रास होते जमलेले.
नरकचतुर्दशीच्या दिवशी
आटपून अभ्यंगस्नाने
फराळ फटाके यांची
तयार केली पाकीटे
जाऊन वाटली बाजूच्या वस्ती
छोट्या मुलांच्या चेहऱ्यावर
आलेले हास्य आनंद पाहून
आनंदले माझे मन.
मुले धावत घरी जाऊन
त्यांच्या आईला होती दाखवत
माझ्याजवळ तर ,होते रास
तयाचे केले होते वाटप .
पण देवाने दिधले मना समाधान
अन् सद्बुद्धी , देण्याचा गरजुंना आनंद.
त्यांच्याही कुटीत रात्री मिणमिणली
पणती पाहून मी संतोषले मनी.
मग गेले राऊळी प्रसन्न मनाने
धरले चरण भगवंताचे.
नित्य दे अशीच सुबुद्धी
ज्योत प्रज्वलित करण्याची
सत्कर्माची मज वेळोवळी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा