अ भा ठाणे जिल्हा समूह १
आयोजित
उपक्रम
विषय - रांगोळी
दिसे दारात शोभिवंत
संस्कृतीतील पारंपारिक
चालत आलेली रांगोळी
दिसे रुप मांगलिक
दारी काढतात रांगोळी
सकाळ होता अंगणी
प्रसन्न वातावरण घरातूनी
सजली रांगोळी वृंदावनी
रांगोळी सणासुदीला
दिवाळीला होई आठवण
काढतात रांगोळी कलात्मक
सप्त रंगाची उधळण
रांगोळी काढणे असे कला
हुबेहूब दाविती प्रसंग
करिती कलेचे प्रदर्शन
पाहून मन होई दंग
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा