शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४

ओला चिंब स्पर्श तुझा

ओला चिंब स्पर्श  तुझा

येता मृगाचे तुषार
ओले चिंब झाले मन
आतुरली होती माती
तृप्त झाले कण कण

ओल्या चिंब स्पर्श  तुझा
मृदगंध पसरला
आसमंत सुगंधित
 कोंब  हळू डोकवला

 होता कृपा वरुणाची
 रंग धरेचा हिरवा
ओला चिंब जल स्पर्श
ऋतू म्हणती बरवा


जलधारा बरसता
वृक्ष  वेली प्रफुल्लित
जन मने झाली पहा
 सृष्टी  संगे आनंदित

ओला  चिंब स्पर्शाची
किमयाच  ही आगळी
रंगे रुपे पालटली
वसुंधरा दिसे वेगळी

वैशाली वर्तक 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...