शनिवार, ३० डिसेंबर, २०२३

संवाद. नदी व सागर. स




स्वप्नगंध साहित्य समूह आयोजित उपक्रम दिनांक 29/11/23
संवाद लेखन
विषय ..नदी आणि सागर

      
सागर..  आलीस?.. ये ग ,सरिते.  मी तुझीच आतुरतेने वाट पाहत होतो. माझ्या लाटा पण उत्सुकतेने  
 उचंबळून...  उंच उंच होऊन तुझ्या वाटे -कडे  डोळे लावून तुझ्या येण्याची वाट पहात आहेत.
नदी ....   हो का रे सागरा. ..? खरच तुला पण इतकीच ओढ असते का मिलनाची ?  माझीही तिचं मनस्थिती
 होती.  कधी एकदा या पठार.. पर्वत रांगा पार करून सपाट भूमीतून  वेड्या वाकडा मार्ग आक्रमित. .... हिरव्यागार शिवारांना  ना टवटवीत करीत .. बळीराजाची खुषी मनी
 अनुभवित  आणि  माझ्या  तटावर  आनंदाने  बागडणारी  मुलं व  उद्याची  सुखस्वप्न रंगवत                                                                                                                                                                               बसलेली युगल पाहून ...मनात खुश होऊन माझ्या    वाटचालीची   मनात सार्थकता  अनुभवित.,संतुष्ट होऊन.... तुला सारे हे अनुभव  सांगण्यास आतुर उत्सुक होऊन ...तुझ्या भव्य  दिव्य  उदात्त विशाल  स्वरूपात  विलीन होऊन.. कधी तुला  अलिंगन देते  असे झाले होते.
सागर... .  हो ग पण . सरिते.  तू तुझे गोड पाणी मला समर्पित करते आणि माझे  खारे पाणी स्विकारते.
नदी..     अरे ,पण माझे बाष्प स्वरूपाचे अस्तित्व तुझ्या ख-या पाण्यातच तयार होते ना ! विसरलास का?
सागर....    पण असे तू किती दिवस करणार?
नदी.   अरे, सागरा  ,माझे गोड पाणी जसे मानवाला *जीवन* रूप आहे तसेच तुझ्या खा-या पाण्यातच रोजच्या 
   अन्नास रुचकर बनविणा पदार्थ... मीठ ...तू मानवास देतोस .  तो तुझ्यात सामावलेला आहे.एक दिवस अळणी जेवण... मीठा शिवाय 
 चालत नाही..शिवाय.  तुझ्या ह्रदयात किती मौल्यवान रत्ने, माणके. मोती आहेत व तूच तर 
 जलसृष्टीचे. संवर्धन करतोस ,. तूझे स्थान महत्त्वाचे आहे.
सागर...   हो ग पंचतत्वातील एक तत्त्व आहोत आपण.
 नदी...  अरे सागरा.. पुन्हा मी बाष्प रुपाने जलद होऊन वरती जाईन ... नाचत बागडत  वर्षा रूपाने  पर्वत  शिखरातून  मार्ग आक्रमत
अशीच तुला भेटायला येणार.  तू तुझा खारट पणा   सोडू नकोस मी माझा गोडवा टिकून ठेवणार. व असेच 
गोड पाणी तुला समर्पित करणार.



वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...