बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

क्षितीजाचा उंबरठा


 क्षितिजाचा उंबरठा


सहजच पूर्तता


अपेक्षांच्या क्षितीजाने पळविले आयुष्यभर

 क्षितीज पूर्तीची आस सदा मनी

पोहचता क्षितीजाच्या उंबरी

 मोदाने भारावले त्याच क्षणी


अथांग निलांबर ,  एका बाजूला      

दुजीकडे पसरलेली अवनी

मनोहर सुंदर रूप तियेचे

पाहूनिया  आनंदले  मनोमनी


 स्थितप्रज्ञ  भासती, ऊतुंग पहाड. 

शुभ्र दुग्ध जलांचे तयात  झरे. 

लहान मोठी तुडुंब जलाशये

अवर्णनीय रुप  वसुधेचे , हेच खरे


पृथ्वीच्या गोल आकाराने

भासे भेटली अवनी नभास 

क्षितीज  असे वदती जन तयास

 पण असतो ह्या रेषेचा अभास


होता अस्त - उदय रवीचा

रंग  सुंदर क्षितिजावर उमटती

तसेच चढ उतार येती जीवनी

 घेत भरारी चालावे जगती


तडजोड काही अपेक्षांची

 काहीची सहजच पूर्तता

मनी बाळगता समाधान

राखावी कुटुंबी कार्य दक्षता.


सांकेतिक कोड नं 101















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...