गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

चित्र काव्य सावली सोबती




सावलीची सोबत

स्वच्छ निर्मल जलात
उभा राहिला  निश्चल विहंग
नजर  सर्वत्र फिरवित
 जलाशय पाहण्यात दंग

बाजुला दिसली  सावली
होती त्याचीच, तया  संगतीला
तसेच मागे जलात प्रतिबिंब
ते. S ही होतेच सोबतीला

जरा करिता हालचाल
बदले  छायेची आकृती
पण प्रतिबिंबित छबी दावी
हुबेहूब .स्व-रुपाची प्रतिकृती

जलातील स्वरुपाला निहाळता
विहंग करी विचार  मनात
जलातील बिंब आहे निरागस
 जैसे  दिसते  दर्पणात 

पण  ,उडून येथून जाता
सावली असेल सोबतीला जीवनी
राहिलं तिच सदैव जवळी
अगदी जीवनाच्या अंतिम क्षणी

वैशाली वर्तक
अहमदाबाद 
२६\९\२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...