*स्पर्धेसाठी*
स्वप्नगंध स्पर्धा समूह आयोजित
स्पर्धा क्रमांक 35
चित्र आधारित
शीर्षक....रक्षण पर्यावरणाचे
येणार घरी माझा बंधुराया
नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनाला
तयासाठी केले नारळी जिन्नस
करवंटीचा उपयोग वृक्ष-संवर्धनाला
हृदयी अनुराग भरलेला
सांगे नसे तो धागा केवळ
मातीत जसे अंकुरले बीज
हृदयी जागा मायेची प्रेमळ
माती रुपी ताई करेल माया
बनुया रक्षक रानावनाचे
बनवुया हरित वसुधेला
सुटतील प्रश्न पर्यावरणाचे
सणवारात आणू आधुनिकता
परंपरेला करिता जतन
मिळेल समाजास संदेश
पर्यावरणचे होईल रक्षण
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा