*स्पर्धेसाठी रचना*
रंगोत्सव महास्पर्धा
कल्पतरू जागतिक साहित्य समूह व
सावली प्रकाशन यांच्या विद्यमाने रंगोत्सव महास्पर्धा
विषय...रंगांची दुनिया
सहाक्षरी रचना
9/3/23
शीर्षक..रंगात रंगूया
जगण्या आनंदी
रंगूया रंगात
रंगची देतात
मोद जीवनात 1
निसर्ग दावितो
रंगाची दुनिया
रंगे परिपूर्ण
रंगाची किमया 2.
येता रवीराज
गगन केसरी
सडे केशराचे
सकाळ हासरी. 3
विविध रंगात
फुललेली फुले
झुळूके सरशी
पहा कशी डुले. 4
मध्यान्ही प्रकाश
तप्त लाल रंग
भासतो प्रखर
लाही लाही अंग 5
मावळतीकडे
रंगची आगळा
सोज्वळ शांतता
दिसतो वेगळा 6
भरलेच रंग
निसर्गात सारे
रंगीत दुनिया
इंद्रधनु न्यारे 7
वैशाली वर्तक
*आयुष्य सप्तरंगी*
जीवन करण्या सप्तरंगी
करा उधळण रंगाची
जगुया आनंदी स्वच्छंदाने
गाऊया गीते आनंदाची
रंगची देती मोद जीवा
पहाताची मन होते दंग
किती मोहक दिसतात
एकाहून एक सुंदर रंग
सृष्टी ने केली उधळण
येताच हा ऋतू वसंत
नानारंगी फुले फुलवून
फूले फुलवण्या नसे उसंत
सूर्य येता प्रभाती नभी
दिसे छटा केशरी रंगाची
होतो आनंद जन मनाला
पाहू रंग उधळण आनंदाची
मिळाला जन्म मानवाचा
करु सोने आयुष्याचे
कशाला खंत निराशा मनीं
रंग उधळूया आनंदाचे
वैशाली वर्तक
अहमदाबाद
स्पर्धेसाठी रचना
रंगोत्सव महास्पर्धा
कल्पतरू जागतिक साहित्य समूह व
सावली प्रकाशन यांच्या विद्यमाने रंगोत्सव महास्पर्धा
10/3/23
विषय ...रंग नव्या उमीदेचा
शीर्षक ....सप्त रंगी जीवन
बहुरंगी जीवन हे
हवे तसे भरा रंग
रंग भरता आनंदे
व्हावे जीवनात दंग
होता सोनसळी उषा
रंग चढे उत्साहाचा
देई मना नव्या दिशा
सोहळाच चैतन्याचा
नभी येता रवीराज
देती ऊर्जा आपल्याला
कार्यरत राहू कामा
वेग येई उत्कर्षाला
रंग जीवनी नभीचे
संध्याकाळी मोद उरी
शांत सोज्वळ ती सांज
ओढ भेटण्याची घरी
सुख दुःख जीवनात
समाधान राखा मनी
आहे जीवन रंगीत
करु सार्थ क्षणोक्षणी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा