गुरुवार, ९ मार्च, २०२३

परिपूर्ण संसार विषय - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हव

अ भा मसा प ठाणे जिल्हा समूह 1
विषय - तुझ्या  माझ्या  संसाराला आणि काय हव
       परिपूर्ण  संसार
  माझ्या मनीच्या इच्छा 
केल्या पूर्ण  सहजीवनी
 साथ  तुझी  मिळता
 भाग्यवान वाटे मनी

भाव मम अंतरीचे
तू सदैव जाणिले
सहज देत हात हाती
सप्त रंगी रंगविले


सहवास तुझा माझा
प्रीत गंध पसरला
एकमेका देत साथ
संसार ही फुलवला

झाले मनाने संतृप्त
काही न उरे मागणे
असेचा सुख नांदो
हेची देवास सांगणे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...