गुरुवार, ९ मार्च, २०२३

वाटे तुलाच पहावे (ओळ काव्य)

ओळ कविता....
 "  वाटे तुलाच पहावे"

झाली नजरा नजर
होता अवचित भेट
ओढ लागली मनास
भरलीच  मनीं थेट

पुन्हा पुन्हा पहाण्यास
शोधू लागलो बहाणा
माझे मजला कळेना
कधी  झालो मी दिवाणा

वाटे तुलाच पहावे
चाले  हा मनाचा खेळ
मन गुंतले तयात
कसा जमवावा मेळ

भाषा तुलाही प्रेमाची
वाटे तुज उमजली
छंद जीवास जडला
कळी माझीही खुलली


  वाटे नयनी ठसावे
चित्ती तुझ्याच उरावे
सुरु शब्दाविण खेळ
वाटे तुलाच पहावे.

वैशाली वर्तक  20/9/2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...