सोमवार, ४ जुलै, २०२२

जळता कशाला कुणावर

रचियता साहित्य  मंच
सामाजिक कविता

*जळता  कशाला कुणावर**

 दुजावर जळणे हा
असे सदाची दुर्गुण
 षडरिपू तील एक 
दूर  ठेवा मनातून

दुजावर जळणे हे
असे लक्षण  द्वेषाचे
त्रास करिती स्वतः ला
सदा असे ते तोट्याचे

ज्याच्या त्याच्या  नशीबाने
देव देत असे जना
मग का उगाच मनी
दुजा वर  रोष मना


दुजा वरी करी ईर्षा
काही होत नसे साध्य
तयापेक्षा समाधान
देई सारे जे असाध्य


मन राखण्या निर्मळ
ऐका सदा संतवाणी
करी मनास प्रसन्न 
वाटे जणु गंगेचे पाणी

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...