विषय - गर्व
स्वभावाचे असती पैलू
क्रोधी , लोभी , निरागस
कोणी अभिमानी वा गर्वीष्ठ
तर कोणी निष्पाप लोभस
स्व अभिमान हा हवाच
तया वदती स्वाभिमानी
घेता गर्वाने जागा मनात
होतो स्वभाव अभिमानी
गर्व नेतो जीवन लयास
जैसे गेले बलाढ्य रावणाचे
प्रकांड पंडित शिवभक्त जरी
गर्वहरण झाले त्याच्या पराक्रमाचे
गर्व करु नये कदापि पैशाचा
रहात नाही समाजात मान
लक्ष्मी च ती असते चंचल
ठेवावे सदा तियेचे भान
गर्व असावा मायबोलीचा
पुरविते ज्ञानाची तहान
तोच गर्व असावा मायभूमीचा
जिच्या कुशीत होतो महान
वैशाली वर्तक
अहमदाबाद
5/4/2021
लोभ, मोह मद दूर सारा
दिली संतानी शिकवण
गर्वाने, मदाने न फुलता
जगावे ह्याची ठेवावी आठवण.
बालपणात ऐकलेल्या गोष्टीचे
ध्यानी ठेवावे जीवनी सार
न करिता गर्व जीवनात
ह्या ज्ञानाचा घ्यावा आधार
दुर्योधनाच्या मनीचा अती गर्व
ठरला त्याच्या विनाशास कारण
असूनी शूर महा योध्दा ज्याने
अंगीकारले नाही सुनीतीचे धोरण
गर्व कशाचाच नसावा मनी
सदा राखावा माणुसकीचा धर्म
आज असे उद्या नसे रुप पैसा
हेच जाणून घ्यावे जीवनाचे मर्म
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा