सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१

अष्टाक्षरी ....सारे सुखाचे सोबती

अ भा म सा प समूह आयोजित  उपक्राम 
ओळ काव्य लेखन
ओळ -- सारे सुखाचे सोबती
 
आहे तंतोतंत खरे
*सारे सुखाचे सोबती*
जेव्हा शीते , येती भुते   
 उगा का जन म्हणती      1

येता कठीण समय
  नाही कोणी फिरकत              
निवारण होता कष्ट
  येण्या नाही  बिचकत           2


मजा लुटण्यात साथ
 येती आनंदात दारी   
संकटात नसे कोणी
तेव्हा वाटे दुःख भारी      3

म्हणूनच म्हणतात 
सुख वाटावे जनात
दुःख  आपण आपले
सदा  सहावे मनात          4

भेट देण्या होती गोळा   
येता आनंदाची    लाट    
करी मजेचा सोहळा.
संकटात    दावी पाठ             5


रीत  आहेच जगाची
दुरुनच मजा पाही
नसे त्यात नवीनता 
 कोणी कुणाचेही नाही             6

वैशाली वर्तक 
अहमदाबाद   20/2/21





सुखाचे सोबती

जगी या  सोबती सारे , जाणा सुखाचे कोण ती
येतो संबध सर्वांचा     गोड  सारेची   बोलती

       होता जन्म नाते जुळे पिता माता करी माया
       सारे प्रेमाचे   सोयरे     करती प्रेमळ छाया
       कधी  पाण्यात राहूनिया  वैर  नको सांगती
       येतो संबध सर्वांचा गोड सारेची बोलती


          जग बाजार स्वार्थाचा टाक जपून पाऊल 
           स्वार्थ भावे भरलेला घेत तयाची चाहुल
           दावी खोटीच माया गुणी जन सारे नसती  
           येतो संबध सर्वांचा गोड सारेची बोलती





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...