शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०२१

सहाक्षरी सोबत क्षणांची

उनाड वारा साहित्य  परिवार
सहाक्षरी     26/2/2021
विषय -- सोबत क्षणांची

सोबत क्षणांची
स्मरते मनात
गंध आठवांचा
उसळे क्षणात

मिळता सोबत
सेवनात ध्यान
गुंगतो भ्रमर
विसरुनी भान

क्षण सोबतीने
दिधला आनंद
जीवास लागला 
भेटण्याचा छंद

सोबत क्षणांची
देते आठवण
स्मृतींची झालीय 
मनी साठवण

नसती जगती
कोणीही कुणाचे
नका करु खंत
सोबती क्षणाचे


सोडुनिया जाती
प्रवासी जगती
सह प्रवासी ते
क्षणाचे सोबती

वैशाली वर्तक






उपक्रम
सहाक्षरी
* *नभात चांदणे**

काळ्या  काळ्या  नभी
मोहक चांदण्या
भासे जणू दिवे
लाविले शोभण्या

शशी संगे येते
शुक्राची चांदणी
सर्वात  शोभून 
दिसे नभांगणी

चांदण्याचा चाले
नभांगणी खेळ
वाटे मजा पहा 
काढुनिया वेळ

चांदण्या रात्रीत
शशी चांदण्यांचा
 रास चाललाय
दिसे गंमतीचा

रातराणी पहा
बहरली कशी
नभीच्या तारिका
उतराव्या जशी

वैशाली वर्तक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...