अ भा ठाणे जिल्हा समूह 2
आयोजित उपक्रम
विषय - काजवा
दाट घन घोर अंधार
चमकताच काजवा
वाटे मनाला दिलासा
आशेचा किरण बरवा
तिमीरात शोभिवंत भासे
काजव्यांच्या दीप ओळी
कुणी रेखाटल्या जणु
काळ्या पटलावर रांगोळी
तिमीर सारतो काजवा
चमकूनी दावी प्रकाश
अंधरल्या जागी करी
लखलखीत अवकाश
आहे मनी सदा आस
व्हावे काजवा जीवनी
सारण्या दुःख दलितांचे
हीच सदिच्छा मनोमनी
वैशाली वर्तक
अष्टाक्षरी करून तीच कविता
घन दाट घोर तम
चमकताच काजवा
वाटे मनाला दिलासा
आशा किरण बरवा
तिमीरात शोभिवंत
काजव्यांच्या दीप ओळी
कुणी रेखाटल्या जणु.
काळ्या वस्त्री या रांगोळी
तिमीर सारी काजवा
दावी मधून प्रकाश
अंधारल्या जागी करी
चमकते अवकाश
आहे मनी सदा आस
व्हावे काजवा जीवनी
सारण्या दुःख दीनांचे
हीच ईच्छा मनोमनी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा