गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०

अष्टाक्षरी दिवाळी.... अनाथांची दिपावली अष्टाक्षरी/एकदिवा सैनिकांसाठी

काव्य स्पंदन 02 राज्यस्तर
दि 11/11/20/ते 12/11/20
काव्य प्रकार  अष्टाक्षरी

**अनाथांची दिपावली**

येता सण दिपावली
वाहे उत्साहाचे वारे
नवी खरेदी करण्या
आले बाजारात सारे

पण पहा अनाथांना
नसे तयांना पालक
कोण करेल कौतुक
किती निष्पाप  बालक

नाही पाहीली आईला
झाली  आबाळच खूप 
प्रेम स्वरूप आईचे
सांगा तुम्हीच  हो रुप

दुःख मय तो तिमीर
लावुनिया दीप ओळी
उजळवू त्यांची घरे
काढु सुंदर  रांगोळी 


देता दिवाळी फराळ 
विलसेल हास्य मुखी
 आनंदाने प्रफुल्लित
दिसतील सारे सुखी


वैशाली वर्तक
अहमदाबाद 12/11/20




शब्दरजनी साहित्य  समूहआयोजित
भव्या राज्य स्तरीय काव्य लेखन
विषय - एक दिवा सैनिकांसाठी
       *स्मरुया बलिदाना*
रोज लावता सांज दीप
स्मरा देश प्रेमी महान
  देशाचे सैनिक आपल्या
अर्पूनिया प्राण करी बलिदान 


सीमेवर रहाती सदा दक्ष
असो सण दिवाळी दसरा
मातृभुमीच्या रक्षणा पहा 
लढती ठेवूनी चेहरा हसरा

साजरी करीतो आजही
दिवाळी आनंदाने उत्साहाने
गमविले प्राण जवानांनी
ऐन दिवाळीत  देशप्रेमाने


खडा पहारा  सीमेवर
लावती  बाजी प्राणांची
 येते  दिवाळी घरोघरी 
लावुया एक दिवा अभिमानानी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद    31/10/21



अ भा म सा प मध्य मुंबई समूह 1
विषय - एक दिवाळी मदतीची

करितो साजरी दिवाळी
आपपल्या कुटुंब जनात
पाहू करुन साजरी दिवाळी
देत मदतीचा हात समाजात

लावूया एक दीपक 
गोर गरीबांच्या घरोघरी 
पहा कसे हास्य  विलसते 
त्यांच्याही  मुखावरी

 नेऊ   दिवाळी फराळ 
     दिवाळीत   वृध्दा श्रमात
 हर्षतीलआजी आजोबा
 मिळेल तया आनंद हृदयात

आणू मातीचे दीपक
खुश होईल  कामगार 
काम करणारे हात
मिळे तयांना आधार

बाकी करतोच दिपावली
मोदे आनंदे नित्य नेमाने
पण अशी मदतीची दिवाळी
 करावी  देण्या मोद क्रमाने


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...