मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

दिवा आशेचा

दिवा आशेचा


दिवा  सारतो तिमीर
अंधःकार रुपी दुःख 
जाते सदाची पळूनी
तेजाळतो देण्या सुख

तेज, प्रकाश ,उजेड
दावी किरणे आशेची
प्रकाशता तेजाने ती
दूर  करी निराशेची

 एक दीप लावताच
आसमंत उजळतो
किंतु , परंतु चे जाळे
मनातून ते जाळतो


भाव  सकारात्मक ते
  देती यशाची चाहुल
मग खचित वळते
 प्रयत्नाचे ते  पाऊल

दिवा तेजाळता पहा
मनी मोद  क्षणभर
भाव ते  सकारात्मक
दिवा होतो दिवाकर

वैशाली वर्तक
13/11/20

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...