उपक्रम
**जेव्हा लेखणी बोलते**
न उच्चारता एक शब्दही
जेव्हा लेखणी बोलते
भाव मनीचे दाविते
गुज मनीचे सांगते
अक्षर अक्षर जोडूनी
शब्दाने गुंफिते मालिका
होते तयार सुंदर कविता
उमलते मनीच्या भाव कलिका
कधी पडखर शब्दांनी
वाचा फोडते भष्टाचारास
उपयोगी ठरते त्याक्षणी
थांबविण्या अत्याचारास
अशीच स्फुरली लेखणी
मिळविण्या स्वातंत्र्यासाठी
हक्काची करविली जाणीव
बोलली लेखणी जनतेसाठी
लेखणी असतेच तत्पर
बोलण्यास मनीचे भाव
जेव्हा लेखणी बोलते
भावनांचा लागे ठाव
वैशाली वर्तक 2/2/2020
**जेव्हा लेखणी बोलते**
न उच्चारता एक शब्दही
जेव्हा लेखणी बोलते
भाव मनीचे दाविते
गुज मनीचे सांगते
अक्षर अक्षर जोडूनी
शब्दाने गुंफिते मालिका
होते तयार सुंदर कविता
उमलते मनीच्या भाव कलिका
कधी पडखर शब्दांनी
वाचा फोडते भष्टाचारास
उपयोगी ठरते त्याक्षणी
थांबविण्या अत्याचारास
अशीच स्फुरली लेखणी
मिळविण्या स्वातंत्र्यासाठी
हक्काची करविली जाणीव
बोलली लेखणी जनतेसाठी
लेखणी असतेच तत्पर
बोलण्यास मनीचे भाव
जेव्हा लेखणी बोलते
भावनांचा लागे ठाव
वैशाली वर्तक 2/2/2020
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा