हृदय मंदिरी शारदे तुझीच मूर्ती
तव चिंतन करिते मज दे तू स्फूर्ती
माते शारदे हृदय मंदिरी ठेवीते तुजला
जड बुद्धी हरण्या ,कृपेचा आशीष दे मजला
शुभ्र फुलांच्या माळा धवल वस्त्र परिधान
शांत सोज्वळ तव मूर्ती देई जनास समाधान
हृदय मंदिरी नित्य ठेवूनी करिते नमन
तूच विद्येची दायिनी तुला मी शरण
हृदय मंदिरी तुझीच नित्य प्रतिमा देवी
कृपा प्रसादाचा आशीर्वाद शीरी तूच ठेवी
वैशाली वर्तक
तव चिंतन करिते मज दे तू स्फूर्ती
माते शारदे हृदय मंदिरी ठेवीते तुजला
जड बुद्धी हरण्या ,कृपेचा आशीष दे मजला
शुभ्र फुलांच्या माळा धवल वस्त्र परिधान
शांत सोज्वळ तव मूर्ती देई जनास समाधान
हृदय मंदिरी नित्य ठेवूनी करिते नमन
तूच विद्येची दायिनी तुला मी शरण
हृदय मंदिरी तुझीच नित्य प्रतिमा देवी
कृपा प्रसादाचा आशीर्वाद शीरी तूच ठेवी
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा