महाराष्ट्र साहित्य सुगंध
१. विषय --चांदण्यातून चालतांना
**आगळाच आनंद*
एक आगळा आनंद
चालतांना चांदण्यात
चमकती अगणिक
तारे नभीच्या अंगणात
चंद्र चांदण्यांचा चाले
खेळ नभी लोभनीय
रुप खुले चंद्रासवे
चांदणीचे रमणीय
मंद वा-याची झुळुक
गंध दरवळे सुमनांचा
हातात हात सखीचा
मनोहर खेळ चांदण्यांचा
अशा रम्य चांदरात्री
प्रेमी युगल रमले
भाव हळुच मनीचे
मुग्धपणे उमजले
प्रकाशित आसमंत
चंद्र तारे गगनात
चांदण्याची रात्र सारे
घालविती आनंदात
वैशाली वर्तक 8/12/20
अहमदाबाद
अ भा म सा प स्वप्नगंध समूह
उपक्रमासाठी
२ विषय - जरा चांदणे पांघरु
एक आगळा आनंद
चालतांना चांदण्यात
चमकती अगणिक
तारे ते नभांगणात
घेऊ आनंद ता-यांचा
लुकलुक करी तारे
शशी हसून बघतो
वाटे पाहुनिया सारे
मंद वा-याची झुळुक
गंध पसरे फुलांचा
पाहू खेळ मनोहर
हात हातात सख्याचा
अशा रम्य चांदरात्री
प्रेमी युगल रमले
भाव हळुच मनीचे
मुग्धपणे उमजले
चंद्र चांदण्याचा चाले
खेळ नभी लोभनीय
जरा चांदणे पांघरु
चांदणीचे रमणीय
वैशाली वर्तक
अहमदाबाद
३. नभीची चंद्रकोर
पहा कशी चंद्रकोर
नभी दिसे मनोहर
थंड मंद वात वाहे
तारे मंदावले क्षणभर
चंद्र चांदण्यांचा चाले
खेळ रात्री लोभनीय
मनोहर चंद्रकोर
तारे दिसती रमणीय
प्रकाशित आसमंत
चंद्रकोर रुपी शशी
दिसे किती तो शीतल
वाटे निहाळावी अशी
पसरली निरव शांतता
यामिनीने जोजविले जन
तिमीर रुपी पांधरुण
ओढुनिया शांत क्षण
निशा येताची सरण्या
बिंब शशीचे मावळेल
लोपतील चांदण्या त्या
प्रकाश तयांचा मंदावेल
वैशाली वर्तक
४. शुभ्र टिपूर चांदणे
आभाळाच्या गाभा-यात
शाळा असे चांदण्यांची
वाट पहाती सांजवेळी
अस्त होण्या आदित्याची 1
आल्या नभात लाजूनी
एक एक करुनी हळुवार
लुकलुक करीत जणू
दिवे लावियले अलवार 2
वाटे घ्याव्या उचलूनी
भरुनिया ओंजळीत
हळुवार गुंफण्यास
फुले म्हणूनी वेणीत 3
जणु भरलीय शाळा
काळ्या काजळ आकाशी
चमचम करी तारे
खेळ खेळण्या चंद्राशी 4
किती दिसती लोभस
तारिकांचे ते रुप रंग
आकर्षित करी जीवा
मन होई पहाण्यात दंग 5
शुभ्र टिपूर चांदणे
मोहाविते जन मना
एक एक तारिका त्या
आकर्षित क्षणा क्षणा 6
चंद्र चांदण्यांचा चाले
खेळ नभी लोभनीय
रुप खुले चंद्रासवे
चांदणीचे रमणीय 7
आ भा मसाप जिल्हा 2 समूह
आयोजित उपक्रम
५. विषय ..ही रात चांदण्यांची
नभी टिपूर चांदणे
भासे किती विलोभनीय
वाटे पहात बसावे
चमचम ता-यांची शोभनीय
लुकलकत्या तारिका
शोभा ता-यांची आगळी
फेर धरुनी सभोवती
होत्या शशीच्या जवळी.
भासे नक्षत्रांच्या राशी
जमल्या खेळण्या रास
रात्र होती पौर्णिमेची
चांदणे पांघरले नभी खास
सहज एकांतात सुचले
सुरेल सुंदर गाणे
ही रात चांदण्याची
मनी जागले तराणे
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा