नदी मिळता सागराला
येते धावत सरिता
मिळण्या ती सागराला
अर्पूनिया गोड पाणी
स्विकारे खा-या पाण्याला
देते जीवन प्राणी मात्रा
येताना वहात खळखळ
करते हिरवी शिवारे
येते पुढे पुढे अवखळ
विसरते अस्तित्व स्वतःचे
होता मिलन सागराशी
जाण्या बाष्परुपे आकाशी
एकरुप होते खारेपणाशी
घेउनिया रुप जलदाचे
जाते खेळाया नभात
ढगांची गट्टी डोंगराशी
पडे खाली पर्जन्य रुपात
वैशाली वर्तक :
येते धावत सरिता
मिळण्या ती सागराला
अर्पूनिया गोड पाणी
स्विकारे खा-या पाण्याला
देते जीवन प्राणी मात्रा
येताना वहात खळखळ
करते हिरवी शिवारे
येते पुढे पुढे अवखळ
विसरते अस्तित्व स्वतःचे
होता मिलन सागराशी
जाण्या बाष्परुपे आकाशी
एकरुप होते खारेपणाशी
घेउनिया रुप जलदाचे
जाते खेळाया नभात
ढगांची गट्टी डोंगराशी
पडे खाली पर्जन्य रुपात
वैशाली वर्तक :
सागर चाराक्षरी
आजचा विषय सागर
शीर्षक - रत्नाकर
वाटे सदा
ओळखीचा
साथी जणु
जीवनीचा
किती तव
विशालता
भव्य दिव्य
अथांगता
लाटा येती
फेसाळूनी
चूर होती
त्या लाजूनी
त्या अधीर
भेटण्यास
धाव त्यांची
किना- यास
मोती रत्ने
मौल्यवान
दडलेली
जणु खाण
म्हणूनीच
ओळखती
रत्नाकर
संबोधती
मासे मारी
करितात
कोळीजन
सागरात
वैशाली वर्तक
प्रदीप वर्तक च्या कवितेवरून
सागरा
अथांग विशालता गहिरता तुझी पाहूनी 16
सागरा मन बघ माझे आले उचंबळूनी 16
लाटा येती फेसाळूनी अधीर त्या भेटण्यास 16
लाजूनी विरूनी चूर होती येता किना-यास 16
हर्षे उल्हासे सप्तरंगी जगतोस रंगूनी 16
सागरा मन बघ माझे आले उचंबळूनी 16
अगणित मौल्यवान मोती दडले तव उरात 16
शोधिता नसे अंत ना पार थकती गर्भात 16
ओळखती रत्नाकर नामे तुजला म्हणूनी 16
सागरा मन बघ माझे आले उचंबळूनी 16
भरती ओहोटी असे जरी जीवनात सदा 16
कसे जमते न दावणे ओहोटी चे दुःख कदा 17
गुढ अशी जीवन कहाणी गाजेत ऐकूनी 16
सागरा मन बघ माझे आले उचंबळूनी 16
वैशाली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा