उपक्रम
विषय- आषाढीची वारी
शीर्षक- **भक्तीभाव**
सावळ्या विठ्ठला ।
ऐक आराधना ।
करिते प्रार्थना ।
भक्तीभावे । ।
तूची आहे घरी ।
जरी नाही वारी ।
वसतो देवा-ही ।
सदाकाळ ।।
रुप तुझे दिसे ।
चित्तात पाहता ।
टाळ ही वाजता ।
घरोघरी ।।
मुखी तुझे नाम ।
भजनात दंग ।
गाउनी अभंग ।
पाही तुला ।।
भक्ती आहे मनी ।
भाव तेथे देव ।
हीच मनी ठेव ।
राखियली ।।
चला दर्शनाला ।
आपुल्या अंतरी ।
आणुया पंढरी ।
भक्तीभावे ।।
पहा विठु उभा ।
आपुल्या शेजारी ।
सेवाव्रत धारी ।
पांडुरंग ।।
वैशाली वर्तक वारी वारी
चला चला, वारीस जाऊ
वैष्णवांच्या संगे राहू
रखुमाईचे दर्शन घेउ
विठ्ठल डोळा भरुनी पाहू
डोईवर ,घेऊनी तुळशी
मनी आस ,विठू दर्शनाची
विठू नाम वसे सदा ओठी
पाउले चालती ,वाट पंढरीची.
ज्ञानोबा-तुकाचा होतसे गजर
रिंगण वारकरी मधेच करत
खेळ फुगडीचा, धरुनीया फेर
भजन किर्तनाची असे संगत
काही भक्त , होऊनी दातार
सोय निवा-याची करण्यात धुंद
सुखकर वारी घडविण्या भक्तांना
वारीस जाण्याचा मिळविती आनंद
वारीत होतो दुःखाचा विसर
मी-तू पणाचा, दिसे अभाव
विठ्ठल नामात, सारेची दंग
सर्वत्र भासे , समतेचा भाव
जो तो दुस-यात विठ्ठल पाही
वारीची अशी, मजाच आगळी
सर्व दुनियेत ,अनोखी अशी
पंढरीची वारी जगा वेगळी
वैशाली वर्तक
यारिया साहित्य समूह आयोजित
अष्टाक्षरी 25/6/2020
विषय - आतुरता त्या वारीची
**विनवणी भक्ताची**
येता आषाढ महिना
वेध लागती वारीचे
मुखी वसे विठु नाम
नेत्री रुप विठ्ठलाचे
वारी विना नाही भूक
भक्त सारे हो लाचार
आतुरता त्या वारीची
विठु सांगना विचार
ध्यानी मनी स्वप्नी दिसे
विठु दिसे सर्व काळ
कधी नाही चुकविली
वारीतील ती सकाळ
तूच असे पांडुरंगा
श्वास भक्त मंडळीचा
सांग आता तू उपाय
पंढरीच्या दर्शनाचा
स्मरु तुज अंतरात
वंदू देश सेवकास
यावे तूच भजनात
द्यावे दर्शन भक्तास
वैशाली वर्तक
!!
विषय- आषाढीची वारी
शीर्षक- **भक्तीभाव**
सावळ्या विठ्ठला ।
ऐक आराधना ।
करिते प्रार्थना ।
भक्तीभावे । ।
तूची आहे घरी ।
जरी नाही वारी ।
वसतो देवा-ही ।
सदाकाळ ।।
रुप तुझे दिसे ।
चित्तात पाहता ।
टाळ ही वाजता ।
घरोघरी ।।
मुखी तुझे नाम ।
भजनात दंग ।
गाउनी अभंग ।
पाही तुला ।।
भक्ती आहे मनी ।
भाव तेथे देव ।
हीच मनी ठेव ।
राखियली ।।
चला दर्शनाला ।
आपुल्या अंतरी ।
आणुया पंढरी ।
भक्तीभावे ।।
पहा विठु उभा ।
आपुल्या शेजारी ।
सेवाव्रत धारी ।
पांडुरंग ।।
वैशाली वर्तक वारी वारी
चला चला, वारीस जाऊ
वैष्णवांच्या संगे राहू
रखुमाईचे दर्शन घेउ
विठ्ठल डोळा भरुनी पाहू
डोईवर ,घेऊनी तुळशी
मनी आस ,विठू दर्शनाची
विठू नाम वसे सदा ओठी
पाउले चालती ,वाट पंढरीची.
ज्ञानोबा-तुकाचा होतसे गजर
रिंगण वारकरी मधेच करत
खेळ फुगडीचा, धरुनीया फेर
भजन किर्तनाची असे संगत
काही भक्त , होऊनी दातार
सोय निवा-याची करण्यात धुंद
सुखकर वारी घडविण्या भक्तांना
वारीस जाण्याचा मिळविती आनंद
वारीत होतो दुःखाचा विसर
मी-तू पणाचा, दिसे अभाव
विठ्ठल नामात, सारेची दंग
सर्वत्र भासे , समतेचा भाव
जो तो दुस-यात विठ्ठल पाही
वारीची अशी, मजाच आगळी
सर्व दुनियेत ,अनोखी अशी
पंढरीची वारी जगा वेगळी
वैशाली वर्तक
यारिया साहित्य समूह आयोजित
अष्टाक्षरी 25/6/2020
विषय - आतुरता त्या वारीची
**विनवणी भक्ताची**
येता आषाढ महिना
वेध लागती वारीचे
मुखी वसे विठु नाम
नेत्री रुप विठ्ठलाचे
वारी विना नाही भूक
भक्त सारे हो लाचार
आतुरता त्या वारीची
विठु सांगना विचार
ध्यानी मनी स्वप्नी दिसे
विठु दिसे सर्व काळ
कधी नाही चुकविली
वारीतील ती सकाळ
तूच असे पांडुरंगा
श्वास भक्त मंडळीचा
सांग आता तू उपाय
पंढरीच्या दर्शनाचा
स्मरु तुज अंतरात
वंदू देश सेवकास
यावे तूच भजनात
द्यावे दर्शन भक्तास
वैशाली वर्तक
पाऊले चालती
सावली प्रकाशन समुह आयोजित
*स्पर्धेसाठी*
राज्य स्तरीय अभंग लेखन स्पर्धा
विषय - पाऊले चालती
पाऊले चालती । वाट पंढरीची ।
आस दर्शनाची । मनोमनी ।। 1
सवय नित्याची । पाऊले चालती ।
वाट ती पाहती । पंढरीची ।। 2
विठु नाम घेता । येते सय खूप ।
चित्ती तुझे रुप । पांडुरंगा ।। 3
माझा विठुराया । वसतो अंतरी ।
जाऊया पंढरी । वारीसाठी ।। 4
चला विठू कडे । चालू सदा वाट ।
पहावया थाट । पंढरीचा ।। 5
वैशाली वर्तक
अहमदाबाद
स्पर्धेसाठी
अखिल भारतीय वैष्णव कला साहित्य मंच , पुणे व अ भा सावित्री ब्रिगेड नागपूर तर्फे राज्यस्तरीय
अभंग लेखन स्पर्धा
विषय आम्ही वारकरी
शीर्षक.. पाऊले चालती
पाऊले चालती । वाट पंढरीची ।
आस अंतरीची | वारीसाठी ||. १
नित्य करी वारी.| भजनात दंग |
वैष्णवांच्या संग | वारकरी || २
वारकरी पाही. | विठु सर्व जनी |
भक्ती भाव मनी | दाटलेला. ||. ३
खंत नसे आम्हा | उन पावसाची |
आस दर्शनाची | विठ्ठलाची || ४
विठ्ठलाची साथ | लाभो सदा काळ |
आनंदी सकाळ | होत असे. ||. ५
होता कृपा दृष्टी । मन आनंदते ।
भरून पावते । सदासाठी ।। ६
नाम घेता विठु. | दिसे वारकरी. |
सदा ध्वजा करी |शोभतसे ||. ७
वैशाली वर्तक
अहमदाबाद
[23/06, 1:21 am] Vaishali Vartak: अभिज्ञान, पुणे आयोजित राज्यस्तरीय काव्य रचना स्पर्धा
विषय.. श्रीविठ्ठल अर्थात पांडुरंग परमात्मा किंवा पंढरपूर माहात्म
शीर्षक...*श्वास माझ्या अंतरीचा*
मनी सदा एक ध्यास
तुझ्या नाम स्मरणाचा
सदाकाळ श्रीविठ्ठला
श्वास माझ्या अंतरीचा
ध्यानी मनी स्वप्नी मज
तूच दिसे सदाकाळ
कधी नाही चुकविली.
वारीतील ती सकाळ.
मुखी घेता तव नाम
विसरते देहभान
तुझ्या दर्शनाची ओढ
गाते तव गुणगान
दूर होती सा-या चिंता
जाते शंकेचे मळभ
मिळे मना सुख शांती
कार्ये होतात सुलभ
विठ्ठलाच्या गजरात
वारकरी होती गोळा
घेता दर्शन विठुचे
वाहे आनंदाश्रू डोळा
नाम स्मरणात असे
अनामिक दृढ शक्ती
दूर होई भवताप
करा मनोभावे भक्ती
झेंडा रोवतील तीरी
हरी नाम गजरात
दुम दुमेल पंढरी
विठ्ठलाच्या भजनात.
वैशाली अविनाश वर्तक
अहमदाबाद (गुजरात)
स्वप्न गंध स्पर्धा साहित्य समूह
स्पर्धा क्रमांक 50
विषय.. आषाढी वारी
शीर्षक...दुम दुमेल पंढरी
वारी निघाली पंढरी
विठु नाम ओठावरी
हरी भक्तीत न्हाहती
वारकरी निरंतरी. 1
जय घोष विठ्ठलाचा
एकादशी आषाढीला
नाम गजर करिता
चला जाऊ पंढरीला. 2
विठ्ठलाच्या गजरात
वारकरी होती गोळा
घेता दर्शन विठुचे
वाहे आनंदाश्रू डोळा. 3
नाम स्मरणात असे
अनामिक दृढ शक्ती
दूर होती भवताप
करा मनोभावे भक्ती. 4
झेंडा रोवतील तीरी
हरी नाम गजरात
दुम दुमेल पंढरी
विठ्ठलाच्या भजनात. 5
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा