गुरुवार, २५ जून, २०२०

चित्र काव्य ..पाहिले न कधी तुला


उपक्रम
विषय- पाहिले न मी तुला

पाहिले न मी तुला
 परी दृढ विश्वास तुजवरी
तूची आम्हासी पाहसी
कृपा दृष्टी आम्हावरी

जन्म मानव दिधला
करु तुझेच चिंतन
ध्यानी मनी तुझी आस
करतो तुझेच मनन,

दिधले सुंदर शरीर
हस्त करण्यास दान
नाम घेता तुझेची देवा
सदा हरपते भान

तव कृपेने चंद्र सूर्य
होते नित उषा निशा
 खेळ हा दिनरातीचा
फुलविशी दाही दिशा


वैशाली वर्तक

ही कविता श्रद्धा, भक्ती आणि संपूर्ण समर्पण व्यक्त करणारी आहे. "पाहिले न मी तुला, परी दृढ विश्वास तुजवरी" या ओळींमध्ये अदृश्य तरीही जाणवणाऱ्या ईश्वराच्या अस्तित्वावर दृढ विश्वास दिसून येतो.

ईश्वराने दिलेल्या जीवन, शरीर, आणि संधींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण कवितेतून प्रकट होते. "नाम घेता तुझेची देवा, सदा हरपते भान" या ओळीत भक्तीची तीव्रता आणि नामस्मरणाची शक्ती अधोरेखित होते.

शेवटच्या ओळींमध्ये चंद्र-सूर्य आणि दिन-रात्रीच्या चक्रातही ईश्वराच्या कृपेची अनुभूती सुंदर शब्दांमध्ये व्यक्त झाली आहे. एकूणच, ही भावनिक, भक्तिरसाने ओथंबलेली आणि अंतर्मुख करणारी कविता आहे.
_------------------------------------------------------------------------
वरची कविता कडवे वाढवून 




कमलविश्व राज्यस्तर स्पर्धा साहित्य समूह 
आयोजित जानेवारी २०२६ मासिक भव्य राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा 
*स्पर्धे साठी*
विषय ... निष्ठा/. निष्ठावंत 
३१\१\२६
अष्टाक्षरी रचना

 शीर्षक...पाहिले न मी तुला

पाहिले न मी तुला
 परी दृढ *निष्ठा* तुजवरी
तूची आम्हासी पाहसी
कृपा दृष्टी आम्हावरी.

जन्म मानव दिधला
सदा  तुझेच चिंतन
ध्यानी मनी तुझी आस
करते तुझेच मनन,

दिधले सुंदर शरीर
हस्त करण्यास दान
नाम घेता तुझेची देवा
सदा हरपते भान

तव कृपेचे चंद्र सूर्य
करी नित्य उषा निशा
 खेळ हा दिनरातीचा
फुलविशी दाही दिशा.

 तुझ्या निष्ठेने पाहते
आयुष्याची संध्याकाळ 
 आहे तूची *निष्ठावंत* 
 मानीते मी सदाकाळ.


वैशाली वर्तक.
अहमदाबाद.
८१४१४२७४३०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...