बुधवार, ८ एप्रिल, २०२०

लीनाक्षरी मनधरणी

उपक्रम
लीनाक्षरी
विषय- सांग कधी कळणार तुला...
     **मनधरणी **

माझ्या मनीचा घे ना तू जरा ठाव
 कधी कळणार तुला माझे भाव

नको जाऊस ना सोडून मजला
कशा न कळती भावना तुजला

तुजपाशी फिरतो भ्रमरा परी
कधी बघशील तू एकदा तरी

जाण तू माझ्या मनीच्या भावना
हीच माझी मनोमनीची कामना

झाल्या जरी माझ्याच चुका अनेक
सोड ना तूची मजला क्षण एक

येना तू जवळी विसरुनी सारे
 वाट पहाती शशी संगे ते तारे      

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चित्र काव्य

नसे चिंता उन पावसाची   मिळविण्या रोजची भाकरी निघाली पहा ललना नाही करित कोणाची चाकरी नवीन घेऊनी भांडी सांभाळीत डोईवर भार तान्हास बांथून कडे...