स्पर्धेसाठी -----
मतदान हक्क माझा 19/10/2019
मतदान असे हक्क आपुला
कधीही हे नका विसरु
सारी कामे बाजूस सारुनी
आवर्जुन आधी मतदान करु
अनेक प्रकारचे असे दान
रक्त दान, नेत्र दान, देहदान
अधिकार दिलाय संविधानाने
बजाविण्या "हक्क माझा मतदान "
मतदानात नको उदासीनता
एका मताधिकाराचे तुम्ही भागीदार
एक एक मत मिळूनच होतो मत-सागर
निवडला जाईल देशाचा शिलेदार
कधी न पडता बळी प्रलोभननांना
नका विकू आपुल्या पवित्र मताला
नैतिक तेने मतदान करुनी
सदा स्मरुया आपुल्या संविधानाला
मतदान आहे पवित्र कार्य
करावे सर्वांनी समजून उमजून
अन्यथा येईल अयोग्य नेता
मतदानाची वेळ , जाता टळून.
वैशाली वर्तक*स्पर्धेसाठी*
मतदान माझा अधिकार स्पर्धा
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश, ठाणे जिल्हा
आयोजित भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा.
विषय...*मतदान माझा अधिकार*
शीर्षक... मतदान हक्क आपुला
मतदान असे हक्क आपुला
कधीही हे नका विसरु
सारी कामे बाजूस सारुनी
आवर्जुन आधी मतदान करु.
अनेक प्रकारचे असे दान
रक्त दान, नेत्र दान, देहदान
अधिकार दिलाय संविधानाने
बजाविण्या "हक्क माझा मतदान "
मतदानात नको उदासीनता,
एका मताधिकाराचा मी भागीदार
एक एक मत मिळूनच होतो मत-सागर
निवडला जातो देशाचा शिलेदार
कधी न, पडता बळी प्रलोभननांना
नाही विकणार माझ्या पवित्र मताला
नैतिकतेने मतदान करुनी
सदा स्मरीन आपुल्या संविधानाला
मतदान आहे पवित्र कार्य
करावे सर्वांनी समजून उमजून
अन्यथा येईल अयोग्य नेता
मतदानाची वेळ , जाता टळून.
वैशाली वर्तक.
अहमदाबाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा